"आदिवासी दिन उत्साहात साजरा”!

Date:11 Aug,2026

adivasi Day

“यंदाचा आदिवासी दिन ९ ऑगस्ट २०२६ रोजी नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात अकलोली, वज्रेश्वरी येथील संस्थेच्या स्वतःच्या जागेत साजरा करण्यात आला.



नेहमीप्रमाणे प्रगती मॅडम उर्फ ‘जगत जननी’ आणि निलेश लाड,वैजयंती मॅडम मुलांसाठी खाऊ तसेच आश्रमासाठी आवश्यक असलेले विविध साहित्य घेऊन आले.

प्रगती मॅडम येणार आहेत, हे कळताच मुलांचा उत्साह नेहमीप्रमाणेच गगनाला भिडलेला असतो. त्यांच्या आगमनाने मुलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मुलींनी सुंदर स्वागतगीत सादर करून उसप्थितांचे स्वागत केले.

adivasi Day

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्यकर्त्या बी. के. नीता यांनी उपस्थिती लावली. त्यांनी मुलांना ध्यानाचे महत्त्व, एकमेकांशी कसे वागावे, एक माणूस म्हणून आपली काय जबाबदारी आणि कर्तव्ये आहेत, याबद्दल अतिशय हलक्या-फुलक्या आणि समजण्यास सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. “स्वप्न बघा, अभ्यास करा आणि एकत्र राहा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी मुलांना दिला.

प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर आश्रमाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच आश्रमातील मुलांचे कपडे नेहमी प्रेमाने शिवून देणाऱ्या श्रीमती रुचिरा जाधव यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर विरार येथील RSS, BJP तसेच संस्कृती संवर्धनाच्या कार्यात सक्रिय असलेले आणि शाळांमधील लहान मुलांना श्लोक शिकण्यासाठी पाठबळ देणारे श्री. चंद्रकांत नागरे यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व, आदिवासी म्हणजे कोण, त्यांची संस्कृती, जंगलाचे संरक्षण, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाचे आपल्या संस्कृतीमध्ये तसेच निसर्ग संवर्धनामध्ये असलेले महत्त्व त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले.

पार्ल्यातील जायफळ पेढा आणि विविध प्रकारच्या बर्फीसाठी प्रसिद्ध असलेल्या दुकानाचे मालक श्री. मिलिंद फडके यांनी आपल्या दुकानातील सहकाऱ्यांसह आश्रमाला धावती भेट दिली. त्यांची मुलांशी झालेली भेट मुलांसाठी विशेष आनंददायी ठरली. त्यांनी आणलेल्या मिठाईचा आस्वाद घेण्याची संधीही मुलांना मिळाली. श्री. फडके यांनी मुलांना भरभरून आशीर्वाद दिले.



यानंतर मुलींनी ‘जंगलाचा रखवाला आदिवासी’ आणि ‘माऊली’ या दोन गाण्यांवर अतिशय सुंदर आणि मनमोहक नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. कोरोनानंतर आश्रम पुन्हा सुरू झाल्यानंतर आश्रमात दाखल झालेली पहिली आदिवासी मुलगी कुमारी तेजल दिवा हिने उपस्थित पाहुण्यांना आदिवासी दिनाचे महत्त्व थोडक्यात समजावून सांगितले.



यानंतर सर्वांनी आदिवासी समाजाचे पारंपरिक तारपा नृत्याचा आनंद घेतला. या पारंपरिक नृत्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली आणि सर्व वातावरण उत्साहपूर्ण झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या सचिव श्रीमती वैजयंती पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे, पाहुण्यांचे, दाते, कार्यकर्ते तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

अशा प्रकारे प्रेम, आपुलकी, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम घडवत यंदाचा आदिवासी दिन अकलोली, वज्रेश्वरी येथे उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.

🌞 Smart ETC - Save money, live better

GET Solar For Housing Society at Zero investement,Zero Maintainance,Free Solar System after PPA Tenor

Solar Open Access Policy For Commercial & Industrial Client: (1)Captive Model. (2)Group Captive Model. (3)Third-Party PPA Model

Without Colatral Finance & EMI MODEL For Solar Power Plant

.

BOOK YOUR ORDER



अन्नदान योजना

आपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.

सकाळचा नाष्टा १००० रुपये
शाकाहारी जेवण २५०० रुपये
मांसाहारी जेवण ३००० रुपये
अशी अन्नदान योजना आहे.


प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२, आश्रमाचा पत्ता.... अकलोली,वज्रेश्वरी, ता.पालघर