Latest Blog

स्वामी आधारवर्धिनी - रुजवात

Date: June 03, 2024

२०१४ मध्ये अचानक मी आणि माझी मैत्रीण त्रंब्यक येथील 'आधारतीर्थ आधाराश्रम' येथील संस्थेस भेट देण्यास गेलो होतो. तिथे शेतकरी आत्महत्या करणारी मुले पाहून मन हेलावले.

Read More

एकमेका साह्य करू की ज्योतीने ज्योत पेटवू म्हणूया.

Date: June 20, 2024

आज शहरामध्ये सुखवस्तू लोक आहेत ज्यांना हवे ते सहज खरेदी करता येत आहे. तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनी ही नशिबवान आहेत की त्यांना शिक्षणाबरोबरच बाकीच्या सर्व गोष्टी विनासायास पाल्य उपलब्ध करून देत आहेत.त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व नाही आहे. पण महत्त्वाचे म्हणजे सर्वांना याची जाणीव आहे की असा एक वर्ग आहे जिथे ह्या सर्वाची गरज आहे. परंतु उपलब्धता त्यांना नाही. अशा गरजू मुलांना ते लगेच मदत देतात. हीच माणसे मग आपल्या सारख्या संस्थेला मदत करतात.रणारी मुले पाहून मन हेलावले.

Read More

9 ऑगस्ट जागतीक आदिवासी दिवस

Date:9 ऑगस्ट,2024

आ समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच या लोकांत जनजागृती व्हावी म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीतील वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात.
आमच्या स्वामी आधारवर्धीनी या आश्रमात जी यंदा ३० मुले शिक्षण घेत आहेत त्यातील ८०% आदिवासी आहेत. त्या मुळे आजचा दिवस आमचे व्यवस्थापक श्रीयुत विजय पवार यांच्या उत्साहामुळे जोरात साजरा झाला. ज्या मध्ये आदिवासी गाणी आणि त्यांचं तारपा नृत्य मुलींनी केले.

Read More

रिल ची ताकत - आदिवासी दिवस

Date:13 ऑगस्ट,2024

रिल ची ताकत काय असते. हे जो सोशल मीडिया वर नाहीं त्याला कळणार नाही. पण जो अक्टिव आहे त्याच्यासाठी ती क्रेझ असते. त्याच्या सारखे आपणही करावं रिल असे वाटत राहते. त्यात जर तुम्ही अर्धवट वयाचे असाल तेव्हा अशा गोष्टींचे आकर्षण खूप असते.
असेच आदिवासी दिंवस संपल्यावर , मज्जा मस्ती आदल्याच दिवशी झाल्यामुळे सध्या पालघर जिल्ह्यातील नंबर एक वर असलेल्या रोशन रावते या रिल मास्टर ला पाहून शाळेतून आश्रमात परतणाऱ्या मुलींनी त्याला आश्रमात आणले. त्याच्या बरोबर फोटो काढले. गाणी आणि नाच केला.
या सर्वात रेकॉर्डिंग ला निघालेल्या, व्यस्त असतानाही मुलासाठी आश्रमात येऊन अर्धा तास त्यांना आनंद देणाऱ्या रोशन ला अनेक आशीर्वाद. मुलांसोबत मुलांसारखे राहून त्यांना आनंद देताना कुठेही आपण मोठे असल्याचा आव त्याच्यात नव्हता. परत येंन्याचे वचन ही तो देऊन गेला. खरेच स्तुत्य आहे. अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो रोशन..स्वामी मय शुभेच्छा तुला..

Read More

शिक्षक दिन

Date:05 September,2024

आज शिक्षक दिन...स्वामी आधारवर्धिनी ची अध्यक्षा म्हणून आश्रमातील मुलांच्या शाळेत प्रमुख अतिथी म्हणून बोलावणे आले. प्रथम संकोच वाटला की अरे...एवढे कुठे आपण मोठे आहोत..पण मग मुले खूष होतील .. आनंद वाटेल म्हणून हो म्हटले. अंबिस्ते येथील या ग्राम पंचायत शाळेत आज डब्बल धमाका होता.

Read More

आश्रम स्टॉल कामना सोसायटी

Date:09 Oct,2024

नवरात्रीच्या सात आठ दिवस आधी कामना सोसायटी, प्रभादेवी यांनी त्यांच्या कडील देवीच्या उत्सवासाठी आश्रम स्टॉल साठी विचारणा केली. हो येते सांगितल्यावर मुलांना आणू शकता का अशी विचारणा केली. परंतु वाडा ते प्रभादेवी पर्यंत कसे आणणार, त्यांना एवढा प्रवास कसा जमेल,

Read More

एकमेंका साह्य करू अवघे धरू सुपंथ.

Date:01 Nov,2024

शैक्षणिक सामाजिक संस्था ही रात्र शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके , गाईड्स वगैरे देते. आत्ता पर्यंत गेल्या सतरा वर्षात महाराष्ट्रातील विविध शाळांना त्यांनी हे साहित्य दिले आहे त्याच बरोबर मुलींना sanitary नॅपकिन दिले आहेत. काही ठिकाणी तर युनिफॉर्म ही वाटप दिले आहेत .


Read More

मुंबई दर्शन

Date:6 Jan,2025

मुंबई चे आकर्षण सर्व जणांना आहे..तसेच ते आपल्या मुलांना ही होते.म्हणून दिनांक ४ आणि ५ जानेवारी २५ रोजी त्यांना आणायचे ठरवले. त्या साठी सर्व फोना फोनी, मेल आणि प्रत्यक्ष जाऊन काही ठिकाणी सर्व ठरवले. आणि तो दिवस आला. पहाटे साडे तीन वाजताच सर्व जण तयार होऊन बसले. हनुमान रोड ला आम्हाला पीक अप करताना थोडे उजाडले होते आणि नेमके प्रथमच विमान उडताना पाहून त्यांना जो काही आनंद झाला ... तो अवर्णनीय आहे.


Read More

स्वामी आधार वर्धिनी चे यंदा चौथे वार्षिक संमेलन २२मार्च २०२५

Date:24 March,2025

स्वामी आधार वर्धिनी चे यंदा चौथे वार्षिक संमेलन २२मार्च २०२५ रोजी पार पडले.
"चैतन्य मूर्ती तू गणेशा" .. या ईश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तेजल ने पाहुण्यांचे स्वागत केले ..आणि स्वागतम्, सुस्वागतम .. या सुंदर गाण्याने प्राजक्ता आणि तिच्या मैत्रिणी नी सुरुवात केली.


Read More

जागतिक आदिवासी दिन आणि एक अविस्मरणीय पन्नाशी!

Date:11 August,2025

नेहमीप्रमाणे यावर्षीही स्वामी आधारवर्धीनी आश्रमात जागतिक आदिवासी दिन आनंदात साजरा झाला. मात्र, यंदाच्या कार्यक्रमात एक खास वळण होतं—आश्रमात नेहमी मुलांचे वाढदिवस साजरे होतात, पण यावेळी आमचे जिवलग मित्र परेश यांच्या मेहुण्याचा ५० वा वाढदिवस एकदम गुपचूप आणि आश्चर्यकारकरित्या साजरा करण्यात आला.


Read More

साखर चौथ गणेशोत्सव – एक आगळावेगळा सोहळा!

Date:12 September,2025

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असे म्हणत आपण बाप्पाला निरोप देतो. पण काहींना आश्चर्य वाटते की विसर्जनानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा गणेशोत्सव येतो. हेच आश्चर्य मला देखील पाच वर्षांपूर्वी पडले होते, जेव्हा **स्वामीआधारवर्धिनी संस्थेच्या आश्रमात** _साखर चतुर्थीला गणपती आणूया_ असे मॅनेजर विजयजींनी सांगितले. तेव्हाच लक्षात आले की हा सोहळा महाराष्ट्रातील एक आगळावेगळा उत्सव आहे


Read More

ज्योत से ज्योत जगा ते चलो!

Date:03 November,2025

“ज्योत से ज्योत जगा ते चलो...हेच दिवाळी चे मर्म. खरे तर दिवाळी म्हणजे काय ? अंधःकार , अज्ञान,तफावत दूर करणे, याच सामाजिक जाणिवेतून आणि सामाजिक जबाबदारी समजून वसई चे लेझिम ढोल ताशा पथक आणि अर्नाळा सोशल वर्क वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे मित्र गण आपल्या संस्थेत आले.


Read More