जागतिक आदिवासी दिन आणि एक अविस्मरणीय पन्नाशी!
Date:11 August,2025
नेहमीप्रमाणे यावर्षीही स्वामी आधारवर्धीनी आश्रमात जागतिक आदिवासी दिन आनंदात साजरा झाला. मात्र, यंदाच्या कार्यक्रमात एक खास वळण होतं—आश्रमात नेहमी मुलांचे वाढदिवस साजरे होतात, पण यावेळी आमचे जिवलग मित्र परेश यांच्या मेहुण्याचा ५० वा वाढदिवस एकदम गुपचूप आणि आश्चर्यकारकरित्या साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात
उत्सव मूर्ती मंदार, त्यांचे आई–वडील (वय ८८ व ९३), सासू–सासरे, मोठा भाऊ, दोन्ही कन्या, पत्नी, बहीण आणि भावोजी परेश यांच्या स्वागताची सुरुवात झाली लेझीमच्या गजरात. प्रमुख पाहुणे मंदार, त्यांचे बाबा आणि सासरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले आणि मुलींनी "चैतन्य मूर्ती तू" या सुंदर गीताने ईशस्तवन सादर केले.
आदिवासी रंग आणि संस्कार
"स्वागतम सुस्वागतम" या गाण्याने पाहुण्यांचे स्वागत झाले. मुलींनी स्वतः बनवलेल्या पुष्पगुच्छ व शाल देऊन पाहुण्यांचा सत्कार केला. तेजलने जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व थोडक्यात सांगितले. यानंतर मुलींनी आदिवासी नृत्य सादर केले—तेही झकास शूज घालून! मुलांनीही मागे न राहता एक झंझावाती आदिवासी गट नृत्य केले.
हास्य, गोष्टी आणि पारंपरिक ओवाळणी
पाहुण्यांविषयी त्यांच्या कुटुंबियांना मजेदार प्रश्न विचारले गेले. लहान पूजाने प्रथमच स्टेजवर मराठी–हिंदी–इंग्रजी मिसळून "मीना" नावाची गोष्ट सांगितली. उत्सव मूर्तीला केक न कापता पारंपरिक ओवाळणी करण्यात आली. ट्रस्टी वैजु ताईंनी मुलांना एक सुंदर गोष्ट सांगितली, अनन्याने एकल नृत्य सादर केले.
सांस्कृतिक वारसा आणि आपुलकीचे क्षण
कार्यक्रमाची सांगता मंदार यांच्या सुरेल आवाजातील "ओंकार प्रधान रूप गणेशाचे" या गाण्याने झाली. जागतिक आदिवासी दिन साजरा करताना मुलांनी दाखवलेली संस्कार, कलाविष्कार, आदर आणि एकोपा—हेच स्वामी आधारवर्धीनी च्या कार्याचे खरे वैशिष्ट्य आहे.
अन्नदान योजना
आपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्र्म जवळ