"महिला दिन उत्सव”!
Date:029 March,2026
“यंदाचा महिला दिन खूपच वेगळा आणि खास होता, कारण राहत्या आश्रमात साजरा होणारा हा शेवटचा कार्यक्रम होता. तसेच रामनवमीचा विचार करून हा कार्यक्रम थोड्या दणक्यात साजरा करण्याचे ठरवले गेले. गेल्या पाच वर्षांत आश्रमासाठी आणि मुलांसाठी विशेष योगदान देणाऱ्या महिलांना निमंत्रित करण्यात आले होते. तसेच सुप्रसिद्ध गायक आलोक काटदरे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
आलेल्या महिलांचे स्वामी आधारवर्धिनी आणि समाजासाठी केलेले योगदान थोडक्यात पुढीलप्रमाणे:
१. श्रीमती अर्चना जनार्दन भोईर (सरचिटणीस - पालघर जिल्हा भाजपा आणि अध्यक्ष - वाडा तालुका महिला दक्षता समिती)
सौ. अर्चना भोईर (रा. बिलावली) यांनी आजपर्यंत अनेक शोषित, वंचित, पीडित, दलित, आदिवासी, ओबीसी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना मिळवून देऊन त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे. त्यांनी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून देणे, शेतकऱ्यांना मदत करणे, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपणे, मुलींची सुरक्षितता आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे अशा विविध क्षेत्रांत काम केले आहे.
कोणताही राजकीय किंवा सामाजिक वारसा नसताना केवळ समाजसेवेच्या वृत्तीने त्या कार्यरत आहेत.
आश्रमाच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी मुलांवर लक्ष ठेवले, त्यांना समुपदेशन केले आणि कोणतीही अडचण आली तर तत्काळ धावून आल्या.
आजही त्यांनी मुलांना आश्वासन दिले की, “तुम्ही कुठेही गेलात तरी घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे.”
त्यांचा सत्कार श्रीमती वैजयंती पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.
२. डॉ. सायली सागर पाटील (खानिवली)
आदिवासी पाड्यात डॉक्टर म्हणून काम करणे अत्यंत कठीण असते, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत. डॉ. सायली पाटील यांनी आश्रमाच्या पहिल्या दिवसापासून मुलांची आरोग्याची जबाबदारी आनंदाने सांभाळली आहे. त्यांनी वेळोवेळी निदान, औषधोपचार, गरज पडल्यास ऍडमिशन आणि सलाईन लावणे तसेच आरोग्याविषयी समुपदेशन केले आहे.
रात्री अपरात्रीही गरज लागली तर त्या धावून येतात.
त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, “एक ध्येय ठरवा आणि त्याचा पाठपुरावा करा.”
त्यांचा सत्कार श्रीमती स्वरा काटदरे यांच्या हस्ते करण्यात आला.
३. श्रीमती साधना गोतारणे (जिल्हा म. सह. बँक)
मुलांमध्ये बचतीची सवय लागावी म्हणून त्यांच्या नावाने बँकेत बचत खाती उघडण्यात आली आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सुरुवातीपासूनच मदत केली आहे.
श्रीमती साधना गोतारणे यांनी खाती वज्रेश्वरी शाखेत स्थलांतरित करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
त्यांचा सत्कार श्रीमती संध्या मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.
४. श्रीमती स्वरा आलोक काटदरे (DS Entertainment)
संगीत क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्वरा काटदरे या कार्यक्रम आयोजनात कुशल आहेत. त्या कलाकार निवड, नियोजन, बजेट, मार्केटिंग आणि नवोदित कलाकारांना संधी देणे अशी अनेक कामे करतात.
आश्रमाच्या सुरुवातीपासून त्या सोबत आहेत. मुलांना संगीताची आवड लक्षात घेऊन त्यांनी म्युझिक सिस्टम व माईक देऊन प्रशिक्षण दिले.
त्यांचा सत्कार श्री. बाबा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी पुढेही मदत करण्याचे आश्वासन दिले.
५. श्रीमती रुचिरा जाधव
मुलांसाठी कपडे शिवून देणे, डिझाईन, अल्टर आणि फिटिंग अशी कामे त्या आनंदाने करतात. अतिशय वाजवी दरात आणि वेळेत त्या काम पूर्ण करतात. त्यांनी मुलींसाठी शिवणकाम शिकण्यासाठी मशीन देण्याचेही आश्वासन दिले. त्यांचा सत्कार श्रीमती अदिती पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांची मुलगी योगिनी (वय १३) हिने शिवगर्जना गीत सादर करून सर्वांची मने जिंकली.
.
६. श्रीमती कविता नडगे आणि प्रणाली पाटील
कविता नडगे या यतीश गोट फार्मच्या व्यवस्थापक असून मुलांना घरासारखे प्रेम देतात. मुलींना साडी नेसणे, मेकअप शिकवणे आणि सुट्टीत फार्महाऊसवर बोलावून त्यांची काळजी घेतात.
त्यांचा सत्कार श्रीमती वृंदा जाधव यांनी केला.
जागेचे मालक , सर्वेसर्वा. बाबा सावंत यांची बाबांची नात असूनही तसे न भासवता ,न वागवता अदिती ची मैत्रीण झालेल्या प्रणाली पाटील हिचा ही सत्कार अदिती आणि स्वतः बाबांनी केला.
🌞 Smart ETC - Save money, live better
GET Solar For Housing Society at Zero investement,Zero Maintainance,Free Solar System after PPA Tenor Solar Open Access Policy For Commercial & Industrial Client: (1)Captive Model. (2)Group Captive Model. (3)Third-Party PPA Model Without Colatral Finance & EMI MODEL For Solar Power Plant
. BOOK YOUR ORDER
कार्यक्रमासाठी मुंबईहून श्री व सौ. सुधीर प्रभू तसेच श्रीमती वृंदा जाधव उपस्थित होते. वाडा विभागातून श्री. जनार्दन भोईर, श्री. सागर पाटील आणि शाळेतून सावंत सर उपस्थित होते.
सर्व पाहुण्यांचे लेझीमच्या गजरात स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर मुलांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमादरम्यान विविध नृत्य सादरीकरणे झाली. “स्वप्नात आले माझ्या दत्त दिगंबर”, “स्वामी समर्थ” आणि “माळून फुले” ही आदिवासी गीते सादर करण्यात आली.
बरोबर १२ वाजता श्रीरामांच्या प्रतिमेला हार अर्पण करून “राम आएंगे” या गाण्यावर सुंदर नृत्य झाले.
प्रमुख पाहुणे: गायक आलोक काटदरे
आलोक काटदरे हे गेल्या २५ वर्षांपासून हिंदी लाईव्ह शोमध्ये गात आहेत. त्यांनी भारतासह परदेशातही अनेक कार्यक्रम केले आहेत.
त्यांनी भाषणात सांगितले, “मी मूर्तीतील देव मानत नाही, पण माझ्यासमोर बसलेल्या या महिलांमध्ये मला देव दिसतो.”
त्यांनी “पल पल दिल के पास” हे गाणे सादर केले आणि शेवटी “झिंगाट” गाण्यावर सर्वांना नाचवले.
आपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्र्म जवळ