>

शिक्षक दिन

Date: September 5, 2024

आज शिक्षक दिन...स्वामी आधारवर्धिनी ची अध्यक्षा म्हणून आश्रमातील मुलांच्या शाळेत प्रमुख अतिथी म्हणून बोलावणे आले. प्रथम संकोच वाटला की अरे...एवढे कुठे आपण मोठे आहोत..पण मग मुले खूष होतील .. आनंद वाटेल म्हणून हो म्हटले. अंबिस्ते येथील या ग्राम पंचायत शाळेत आज डब्बल धमाका होता.

शाळेचे founder member पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांची जयंती जी खरी तारखेने ९ ला असते परंतु यंदा तेव्हा गणपती रजा असल्याकारणाने ती ही आज चसाजरी करण्यात आली. नेहमीप्रमाणे दीप प्रज्वलन , ईश स्तवन ने सुरुवात झाली. तेव्हा श्रीयुत जमादार सर,यांनी आजचे शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर श्रीयुत पाटील सर यांनी स्वतः अण्णासाहेब ज्यांचा जन्म १९२२ साली झाला तेव्हा काही सुविधा नव्हत्या. पण शिक्षण घेण्याच्या तळमळीने ते कुडुस ते गोऱ्हे..थांबत थांबत ५ किलोमीटर चालत येत आणि परत जात.तशा परिस्थितीत ते vernacular ची परीक्षा पास प्रथम श्रेणीत पास झाले. त्यानंतर मॅट्रिक ही फर्स्ट क्लास मध्ये पास झाले नंतर एम. ए. झाले.शिक्षक झाले.खासदार झाले. आपल्या सारखा त्रास पुढील विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून १९६७ साली त्यांनी ही शाळा चालू केली. मुलांसाठी हॉस्टेल ही चालू केले . असे विस्तृत पण सांगितले. सध्याचे मुख्याध्यापक श्रीयुत वसईकर यांनी ही धमाकेदार भाषण केले. गोष्टी रुपात मार्ग दर्शन केले. मुलांसाठी खूप सुविधा त्यांना करायच्या आहेत हे ही संगितले

अध्यक्ष म्हणून मग मी ही भाषणात...किंबहुना मुलाशी संभाषण साधत त्यांना थोडे मार्गदर्शन केले. गुरू आणि शिक्षक यातील सूक्ष्म फरक सांगितला. मुली ज्या शिक्षिका बनल्या होत्या...त्यांच्या भीतीचा धागा पकडून सांगितले की दुसऱ्याच्या बुटात पाय घातला की कळते की त्यांचे काम कसे अवघड आहे. त्यात किती दगदग आहे...तसेच शिक्षक हा २४ तास शिक्षक च असतो. कसे तो विद्यार्थ्यांना घडवतो.. इत्यादी... फक्त या सर्वात एकच गोष्टीचे वाईट वाटते की शाळेला ग्रँट आहे. परंतु खूप गोष्टींचा अभाव आहे. नुसते सरकारी योजना या कागदावर असतात. पण प्रत्यक्ष राबवत नाहीत. Cc TV camera. Thumb machine..asha गोष्टीवर अमाप पैसा खर्च होतो. देखभाल शून्य. पण गरजेचे टॉयलेट नाही. शिक्षक ही वाडा, कल्याण भिवंडी वरून स्व खर्चाने येतात. पण बाथरूम नाही. पुरेसा लाईट, पंखे यांचा अभाव. तरीही ५ ते ,१२ वी ची मिळून ४७८ मुले आनंदाने शिक्षण घेत आहे. आनंदाने अशा दृष्टीने म्हटले की आज मुलांनी शाळा सजवली होती, सर्व बाबतीत पुढाकार घेतला होता. तसेच रूटीन कार्यक्रम संपल्यावर मुलांनी शिक्षकांना गुलाब देऊन त्यांचा सन्मान केला तो ही मुलांकडून. खूप बरे वाटले अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

शिक्षणाबरोबरच अन्न आणि वस्त्र ह्या मूलभूत गरजा ही भागवायचां आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुम्हा सर्वांना ही नम्र विनंती आहे की प्रत्यक्ष येऊन आश्रमास जरूर भेट द्या. अथवा अन्न - वस्त्र यांचे दान करा. त्यासाठी संपर्क करा

Bank QR Code
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२ आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्म जवळ