स्वामी आधारवर्धिनी - रुजवात

Date: July 3, 2024

२०१४ मध्ये अचानक मी आणि माझी मैत्रीण त्रंब्यक येथील 'आधारतीर्थ आधाराश्रम' येथील संस्थेस भेट देण्यास गेलो होतो. तिथे शेतकरी आत्महत्या करणारी मुले पाहून मन हेलावले. मुंबई मध्ये आल्यावर ही सतत तोच विचार मनात होता की आपण काय करू शकतो? बरे केले तरी दर वेळी नाशिक येथे ते कसे पोचवणार? आपल्यावर विश्वास ठेवून या आश्रमाला कोण आणि कशी मदत करणार ?

अचानक तीन- चार महिन्यांनी तिथे मॅनेजर असलेल्या मुलाचा फोन आला की मॅडम मी आत्ता वज्रेश्वरी येथे आश्रम चालू करत आहे. काही मुले माझ्या बरोबर आली आहेत. तरी तुम्ही काही मदत कराल का ?

मग श्रीयुत विकास दादा आमटे यांच्या मार्गदर्शनाने २०१५ साली चालू झालेल्या या स्वामी आधार वर्धिनी नावाने नोंदणी झालेल्या या आश्रमात सुरुवातीला चार वर्षे शेतकरी आत्महत्या केल्यामुळे अनाथ झालेली जवळपास २८ मुले शिक्षण घेत होती. ग्रहण लागल्यासारखा २०२० साली आला करोना. आश्रम पूर्ण रिकामी करावा लागला. २१ साली परत चालू करताना त्यातील काही मुले-मुली १८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे परत घेऊ शकलो नाही. ती मुले electrician, plumbing वगैरे शिकायला गेली तर मुली नर्सिंग कोर्स साठी गेल्या. आश्रम ही अंबिस्ते, वाडा येथे स्थलांतरित करावा लागला आणि तेथील आसपासच्या गावातून आलेली आज ३० आदिवासी मुले शालेय शिक्षण घेत आहेत.

शिक्षणाबरोबरच अन्न आणि वस्त्र ह्या मूलभूत गरजा ही भागवायचां आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुम्हा सर्वांना ही नम्र विनंती आहे की प्रत्यक्ष येऊन आश्रमास जरूर भेट द्या. अथवा अन्न - वस्त्र यांचे दान करा. त्यासाठी संपर्क करा

Bank QR Code
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२ आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्म जवळ