रिल ची ताकत - आदिवासी दिवस
Date:13 ऑगस्ट,2024
रिल ची ताकत काय असते. हे जो सोशल मीडिया वर नाहीं त्याला कळणार नाही. पण जो अक्टिव आहे त्याच्यासाठी ती क्रेझ असते. त्याच्या सारखे आपणही करावं रिल असे वाटत राहते. त्यात जर तुम्ही अर्धवट वयाचे असाल तेव्हा अशा गोष्टींचे आकर्षण खूप असते. असेच आदिवासी दिंवस संपल्यावर , मज्जा मस्ती आदल्याच दिवशी झाल्यामुळे सध्या पालघर जिल्ह्यातील नंबर एक वर असलेल्या रोशन रावते या रिल मास्टर ला पाहून शाळेतून आश्रमात परतणाऱ्या मुलींनी त्याला आश्रमात आणले. त्याच्या बरोबर फोटो काढले. गाणी आणि नाच केला. या सर्वात रेकॉर्डिंग ला निघालेल्या, व्यस्त असतानाही मुलासाठी आश्रमात येऊन अर्धा तास त्यांना आनंद देणाऱ्या रोशन ला अनेक आशीर्वाद. मुलांसोबत मुलांसारखे राहून त्यांना आनंद देताना कुठेही आपण मोठे असल्याचा आव त्याच्यात नव्हता. परत येंन्याचे वचन ही तो देऊन गेला. खरेच स्तुत्य आहे. अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो रोशन..स्वामी मय शुभेच्छा तुला.वो रोशन..स्वामी मय शुभेच्छा तुला.
माझा आयुष्यातला न विसरता येणारा क्षण || ROSHAN CHE FAN || #milinddhadapi #roshanravt e
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. दिसायला छोटे होते पाण रोशनचे फॅन खुप मोठे होते || ROSHAN CHE FAN || #milinddhadapi #roshanravte :Pls Like & Share अन्नदान योजनाआपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्म जवळ