Date: Nov 1, 2024
एकमेंका साह्य करू अवघे धरू सुपंथ.
प्रज्योती शैक्षणिक सामाजिक संस्था ही रात्र शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य आणि पुस्तके , गाईड्स वगैरे देते. आत्ता पर्यंत गेल्या सतरा वर्षात महाराष्ट्रातील विविध शाळांना त्यांनी हे साहित्य दिले आहे त्याच बरोबर मुलींना sanitary नॅपकिन दिले आहेत. काही ठिकाणी तर युनिफॉर्म ही वाटप दिले आहेत . त्या साठी श्रीयुत सावंत साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे कौतुक आहे. यंदा त्यांनी आपल्या आश्रमातील मुलांस ही वह्या, stationery आणि खाऊ दिला आणि एक दिवस मुलां बरोबर घालवला त्यांना चांगले मार्गदर्शन केले. त्या बद्दल त्यांचे आभार...खरोखर चांगली माणसे भेटली की साखळी तयार होते आणि आपली हिम्मत वाढते.जसे की दहावीतील मुलींना गाईड्स मिळणार म्हणून त्या खूष आहेत...
स्वामी आधारवर्धिनीच्या अध्यक्षा प्रगती आचरेकर म्हणतात ना. ......
💥 एकदा अशी दिवाळी असु देआंधळ्याना नेत्राने स्पष्ट दिसु देगरीबांच्या घरी भरपुर फराळ असु देभारतात कुठेही भिकारी नसुदेएकदा अशी दिवाळी येऊदे सर्व लोंक एकमेंकाना सहकार्य करु देकामगार-मालक नातेही घट्ट होऊ देतराष्ट्र पुढे नेण्यासाठी नेत्यांमध्ये एकता नेहमी दिसु देएकदा अशी दिवाळी येऊदे पर्यावरण सांभाळण्यासाठी विचार घट्ट रुजुदेअभ्यास गुणासाठी नसुन ज्ञानासाठी हे मनी रुजुदे,सर्वांचे कुटुंब *निरोगी, सुखी, शांती व समाधनानी*भरुदेएकदा अशी दिवाळी येऊदे *हुंडाबंदी*होऊदे *भृणहत्या कायदा*कड़क होउ दे*आत्महत्या होऊच नये त्यासाठी सद़्बुद्धी*सर्वाना मिळुदेएकदा अशी दिवाळी येऊदेभक्तीत भगवंत अखंड सोबत वसु देगुरु आणि शिष्याचे नाते घट्ट असुदेएकदा अशी दिवाळी असुदे विश्वातील चरांचरात एक तत्त्व दिसु देएकच विश्वरुपाने प्रगट झाला ही दिव्य दृष्टी मिळुदेहे विश्वची माझे घर हा अनुभव जागृत होऊदेएकदा अशी दिवाळी असुदे या दिवाळीत तुमच्या अंतरंगातील ज्योत पेटुदेदिव्य विचार किरंणानी जीवन प्रकाशीत होऊदेआपल्या जीवनात आनंदीआनंद प्रत्येक क्षणी फुलुदे एकदा अशी दिवाळी येऊदे
शिक्षणाबरोबरच अन्न आणि वस्त्र ह्या मूलभूत गरजा ही भागवायचां आम्ही आटोकाट प्रयत्न करत आहोत. त्यासाठी तुम्हा सर्वांना ही नम्र विनंती आहे की प्रत्यक्ष येऊन आश्रमास जरूर भेट द्या. अथवा अन्न - वस्त्र यांचे दान करा.
अन्नदान योजना
आपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्र्म जवळ