ज्योत से ज्योत जगा ते चलो!
Date:03 November,2025
“ज्योत से ज्योत जगा ते चलो...हेच दिवाळी चे मर्म. खरे तर दिवाळी म्हणजे काय ? अंधःकार , अज्ञान,तफावत दूर करणे, याच सामाजिक जाणिवेतून आणि सामाजिक जबाबदारी समजून वसई चे लेझिम ढोल ताशा पथक आणि अर्नाळा सोशल वर्क वेल्फेअर असोसिएशन संस्थेचे मित्र गण आपल्या संस्थेत आले.
मुलांनी खूप छान छान ग्रीटिंग तसेच कंदील बनवून ठेवली होती. त्यातून महत्वाचे म्हणजे किल्ला बनवला होता. मुलांनी तारपा नृत्य, कुपारी साँग, गोष्टी, गाणी सादरीकरण ही केले, कोणी गोष्ट, कोणी गाणे ,अर्नाळा सोशल वर्क वेलफेअर असोसिएशन संस्थेनी मुलांना नवीन कपडे,दिले, व अन्नदान केले, सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांबरोबर चार तास धमाल मस्ती, संवाद , काही मार्गदर्शन केले.अशा तऱ्हेने आप आपल्या एका पणती ने दुसरी पणती उजळत ठेवली.उपस्थित प्रत्येकाच्या मनातला सद्बुद्धीचा दिप अधिक उजळून निघाला..
अन्नदान योजना
आपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्र्म जवळ