साखर चौथ गणेशोत्सव – एक आगळावेगळा सोहळा!
Date:12 September,2025
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असे म्हणत आपण बाप्पाला निरोप देतो. पण काहींना आश्चर्य वाटते की विसर्जनानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा गणेशोत्सव येतो. हेच आश्चर्य मला देखील पाच वर्षांपूर्वी पडले होते, जेव्हा **स्वामीआधारवर्धिनी संस्थेच्या आश्रमात** _साखर चतुर्थीला गणपती आणूया_ असे मॅनेजर विजयजींनी सांगितले. तेव्हाच लक्षात आले की हा सोहळा महाराष्ट्रातील एक आगळावेगळा उत्सव आहे.
साखर चौथ म्हणजे काय?
---------------------अनंत चतुर्दशी नंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला **साखर चौथ** म्हणतात. या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना केली जाते आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. काही ठिकाणी अडीच, पाच, अकरा किंवा एकवीस दिवसांचे बाप्पाही बसवले जातात. हा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्राच्या पेण, उरण आणि पनवेल तालुक्यांतील **आगरी समाजात** साजरा केला जातो. या गणपतींना _गौरा गणपती_ असेही म्हटले जाते.
परंपरा आणि श्रद्धा
------------------- भाद्रपदातील गणेशोत्सवात काही घरांत गणपती बसवता येत नाही. - जर गणपती आगमनाच्या दिवशी चुकून चंद्रदर्शन झाले असेल तर दोष निवारणार्थ या दिवशी उपवास केला जातो. - विशेष म्हणजे, गणेश चतुर्थीला निषिद्ध असलेल्या चंद्राचे दर्शन या दिवशी आवर्जून घेऊन मगच आरती केली जाते.
पूजा आणि प्रसाद
---------------आरती ही परातीत केली जाते. नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक अर्पण केले जातात. पण या दिवशीच्या मोदकांची खासियत वेगळीच असते – ते गुळ-खोबऱ्याचे नसून **खोबरं आणि साखर** घालून बनवले जातात. हाच खरा _साखर चौथीचा प्रसाद_.
स्वामीआधारवर्धिनी संस्थेतील साखर चौथ
-------------------------------------**स्वामीआधारवर्धिनी संस्थेच्या आश्रमात** हा सोहळा दरवर्षी भक्तिभावाने पार पडतो. भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहतात आणि गणपतीबाप्पाच्या आरत्या, पूजा आणि प्रसादाचा आनंद घेतात. संस्थेच्या आध्यात्मिक कार्यात या सणाचे खास स्थान आहे.✨ **साखर चौथ गणेशोत्सव** म्हणजे भक्ती, परंपरा आणि अनोख्या संस्कृतीचा संगम आहे. हा सोहळा प्रत्येक भक्ताला आनंद, उत्साह आणि आध्यात्मिक समाधान देतो.
अन्नदान योजना
आपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्र्म जवळ