आश्रम स्टॉल कामना सोसायटी
Date:9 ऑगस्ट,2024
मुंबई चे आकर्षण हे सर्व जगात सगळ्यांना आहे. मग आश्रमातील मुलांना ते कसे नसेल? ज्यांनी पाडयाशिवाय काही पाहिलेच नाही आणि आत्ता फक्त अंबिस्टे आश्रम ते ग्रामपंचायत शाळा एवढेच त्यांचे विश्व मर्यादित आहे. त्यांना यंदाच्या नाताळ सुट्टीत आम्ही घेऊन यायचे वचन दिले. आणि तशा तयारीला ही लागलो होतो.............
इतक्यात नवरात्रीच्या सात आठ दिवस आधी कामना सोसायटी, प्रभादेवी यांनी त्यांच्या कडील देवीच्या उत्सवासाठी आश्रम स्टॉल साठी विचारणा केली. हो येते सांगितल्यावर मुलांना आणू शकता का? अशी हळूच विचारणा केली. परंतु वाडा ते प्रभादेवी पर्यंत कसे आणणार, त्यांना एवढा प्रवास कसा जमेल, बरे, सर्वांना आणायचे की फक्त थोड्याच मुलांस ..असे करता करता फक्त तेरा मुलांना घेऊन यायचे ठरले आणि आमचे निलेश भाऊ अर्थात ज्यांच्या मुळे हे निमंत्रण मिळाले..यांनी त्यांना आणायची आणि पोचवायची जबाबदारी घेतली. आणि दिनांक ६ ऑक्टोबर रोजी रात्री मुले आली ही मुंबई मध्ये. रात्रीचा प्रवास होता त्या मुळे काही विशेष कळले नाही त्यांना. पण दादर ला ट्रस्टी च्यां सोसायटीत आयुष्यात प्रथमच लिफ्ट मध्ये चढताना तेरा ही शूर वीर गांगरले. जसजशी लिफ्ट वर जात होती तस तसे चेहऱ्यावरची भीती आणि आश्चर्य असे संमिश्र भाव होते त्यांच्या मनात.नंतर त्यांच्याच सोसायटी मध्ये दोन जणांनी छोट्याश्या खोलीत दिलेला नाष्टा त्यांना माणुसकीचे दर्शन देऊन गेला. त्यानंतर दादर ते प्रभादेवी टॅक्सीतून येताना उंच सोसायटया... बिल्डिंग पाहून डोळे चमकले.... ब्रीज पाहून ...मोठा मोठल्या गाड्या, बसेस आणि चालणाऱ्या पादचाऱ्यांची कसरत पाहून ही तोंडात बोटे घातली. ...
जेव्हा मुख्य कार्यक्रम ठिकाणी आलो तेव्हा मात्र त्यांनी तिथे on the spot चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला....सुरुवातीला बाकीच्या मुलांचे निरीक्षण करण्यात गेला ..पण नंतर कागद हातात आल्यावर मात्र अगदी न बुजता.. चित्रे काढली...हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला...आणि हो त्यात पहिले आणि दुसरे बक्षीस असे ही मिळवले...
दुपारी भंडारा मध्ये जेवण न देता माझ्या घरीच तुमचे जेवण आहे तरी तुम्ही वर या ..अशा संयोजकांच्या घरी त्यांच्या ज्येष्ठ आई बाबांबरोबर त्यांनी श्रीखंड पुरीवर छानच ताव मारला...निघताना आजीच्या सुनेने त्या सर्वांना कुंकू लावून दिलेले गिफ्ट घेऊन खुषी ने खाली उतरले...आणि मुंबईच आदरातिथ्याचे ही त्यांना भारी वाटले.
जेवण आटोपल्यावर त्यांनी बसवलेले नाच त्यांनी केले. त्यातील गौरी आईची विनवणी, डाफ्याचा चष्मा ही गाणी once more घेणारी ठरली..त्या पेक्षा सरस म्हणजे तारपा नृत्यावर सोसायटी मधील लहानापासून मोठ्यांनी धरलेला त्यांच्या बरोबर धरलेला फेर..त्यामुळे मुलांना झालेला आनंद.... अवर्णनीय होता. कामिनी देवीची आम्हाला आशीर्वाद रुपी मिळालेली फ्रेम..ही तिथे बाकीच्या मिळालेल्या गोष्टींपेक्षा नक्कीच वंदनीय आहे. देवी आम्हाला आमच्या स्वतःच्या जागेत नक्कीच पोचवेल याची खात्री आहे. असाच आशीर्वाद कायम ठेवा .. हीच सदिच्छा
अन्नदान योजनाआपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्र्म जवळ