9 ऑगस्ट जागतीक आदिवासी दिवस
Date:9 ऑगस्ट,2024
आ समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच या लोकांत जनजागृती व्हावी म्हणून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीतील वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस साजरा करतात. आमच्या स्वामी आधारवर्धीनी या आश्रमात जी यंदा ३० मुले शिक्षण घेत आहेत त्यातील ८०% आदिवासी आहेत. त्या मुळे आजचा दिवस आमचे व्यवस्थापक श्रीयुत विजय पवार यांच्या उत्साहामुळे जोरात साजरा झाला. ज्या मध्ये आदिवासी गाणी आणि त्यांचं तारपा नृत्य मुलींनी केले.
आजच्या प्रमुख पाहुण्याचे दरवाजावर लेझिम आणि ढोलकी च्या तालावर स्वागत करण्यात आले. हॉल मध्ये येताना प्रत्येकाला सौ. अदिती हिने ओवाळून आत घेतले. त्यांच्यावर पुष्प वृष्टी केली. प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन झाले. शाल, श्रीफळ आणि गुलाब फुल देऊन सर्वांचा सत्कार ही करण्यात आला. त्या नंतर अम्बिस्ते येथील माध्यमिक शाळेचे(जिथे आपली मुले शिक्षण घेत आहेत) ट्रस्टी श्रीयुत भरत सावंत यांनी त्यांच्या संस्थे तर्फे चालणाऱ्या विविध शाळांची माहिती दिली आणि रोज सकाळी आश्रमात दूध न्यायला येतो तेव्हा तुमच्या कडे मुले किती छान आपापली कामे करत असतात. या बद्दल त्यांचे कौतुक केले. त्यानंतर विद्यमान मुख्याध्यापक श्रीयुत प्रदीप वसईकर यांनी ही आपल्या संस्थेतील मुलांपेक्षा तुमची मुले किती व्यवस्थित आणि शिस्तीत आहेत . एकमेकांबद्दल त्यांना किती आपुलकी आहे या बद्दल शाबासकी दिली. यंदा निवृत्त झालेल्या श्रीयुत जमादार सरांनी ही मुलांना आश्वासन देताना सांगितले की अभ्यासात कोणतीही अडचण आली की पहिले मला सांगा . स्पेशली १० तील मुलींना त्यांनी आम्ही शनिवार रविवार येऊन मार्गदर्शन करू सांगितले. शाळेतील इतर शिक्षक आणि शिक्षिका यांच्या सह इतर कर्मचारी वर्ग ही आला होता. त्यामुळे मुलांना गुरू पौर्णिमा साजरी करण्याचा फील आला. काय करू आणि किती करू असे झाले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आम्हाला ही आनंद झाला.कारण गुरू शिष्य यांस एकत्र मौज करताना चे समाधान वेगळेच होते. आश्रमाचे मालक श्रीयुत बाबा सावंत यांना ही भाषण करताना भरून आले आणि त्यांच्या हातून माईक गळून पडला. मुलांच्या सहवासात दिवस कसा गेला ते कळलेच नाही. अन्नदान योजनाआपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्म जवळ