स्वामी आधार वर्धिनी चे यंदा चौथे वार्षिक संमेलन २२मार्च २०२५

Date:24 March,2025

स्वामी आधार वर्धिनी चे यंदा चौथे वार्षिक संमेलन २२मार्च २०२५ रोजी पार पडले.
"चैतन्य मूर्ती तू गणेशा" .. या ईश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तेजल ने पाहुण्यांचे स्वागत केले ..आणि स्वागतम्, सुस्वागतम .. या सुंदर गाण्याने प्राजक्ता आणि तिच्या मैत्रिणी नी सुरुवात केली.
प्रथेप्रमाणे जमलेल्या पाहुण्यांमधील श्रीयुत प्रदीप वसईकर...मुख्याध्यापक अंबिस्ते शाळा, श्रीयुत नरेंद्र जाधव ... मुख्याध्यापक , खानिवली शाळा, श्रीयुत सागर पाटील... संगिता पाटील इंग्लिश मिडीयम शाळेचे मुख्याध्यापक ,तसेच अंबिस्ते आणि खानिवली शाळेतील उपस्थित सर्व शिक्षक–शिक्षिका आणि पाहुण्या यांचा सत्कार करण्यात आला. स्त्री शक्तीचा जागर म्हणून अंबे कृपा करी या गीतावर मुलीनी सुंदर नृत्य केले.
मान्यवरांच्या सत्कारामध्ये सर्व प्रथम डॉ. सायली सागर पाटील यांचा हार ,शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला तेव्हा त्यांनी मुलांना आपल्या मध्ये काय कमी आहे ते ओळखा असे सांगितले. आणि मग ते कमी पण कसे भरून काढायचे, कधी कधी त्या कडे कसे दुर्लक्ष करून आपण मार्गस्थ कसे व्हायचे याची उत्तम माहिती दिली. या नंतर शंकर बाबा हो...या गाण्यावर कनक नाथ आणि इतरांनी भजन सादर केले.
दुसरा सत्कार श्रीमती अर्चना जनार्दन भोईर, अध्यक्ष महिला दक्षता समिती यांचा केल्यावर मुलांना मार्गदर्शन करताना त्यांनी एकच गोष्ट सांगितली आणि ती म्हणजे आपली बाजू सत्याची असेल तर त्याची कास सोडू नका. ठाम रहा. निर्भय रहा. मग कोणी तुमचं काही वाकडे करू शकणार नाही..मग तो बाहेरचा असो वा घरातला असो.



या सत्कारानंतर स्त्री वर्गाचे खंबीर पाठीराखे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैवत छत्रपती या गाण्यावर अनन्या आणि इतर मुलींनी झेंडा फडकवत नृत्य केले.
भरपूर पुरस्कारानी सन्मानित. विविध देशात,अनेक दिग्गज आणि नामवंत लोकांसमोर आपली कला सादर केलेल्या, साध्या मुलांनाच नाही तर मूक बधिर मुलांना आपली कला शिकवणाऱ्या भारतातील पहिल्या महिला जादुगार श्रीमती मधुगंधा इंद्रजीत या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होत्या. जादू ही बोटांची विशेष करामत आहे. बाकी काही नाही असे त्या म्हणाल्या. समोरच्याशी बोलत,त्याला गुंगवत ठेवून,संवाद साधत कसे राहायचे याचे प्रात्यक्षिक देत देत त्यांनी जादूचे प्रयोग केलेआणि सर्वांची मने जिंकली



त्यानंतर रानो मुंबई की रानो या हल्ली ट्रेंड असलेल्या गाण्यावर मुलींनी नाच केला आणि त्यापाठोपाठ आश्रमातील सर्व मुलांनी हमको पढना है... या गाण्यावर शाळेच्या ड्रेस वर डान्स केला. विशेष म्हणजे जमलेल्या पाहुण्यांकडून वरील सर्व नृत्यांना उस्फुर्त दाद मिळाली. त्याच बरोबर २८०० रुपये बक्षीस हे मिळाले. सर्वात शेवटी नुसत्या वाद्यावर आधारित आदिवासी तारपा डान्स मुलींनी केला ज्या मध्ये उपस्थित सर्व महिलाही थिरकल्या. अतिशय बाहेर गरमी असतानाही. घामाच्या धारा निखळत असतानाही अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला. कुमारी संजीवनी हिने आभारप्रदर्शन केले आणि राष्ट्र गीताने सांगता झाली


हा संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केलेल्या सर्व स्वयम् सेवकांचे स्वामी आधार वर्धीनी कडून शतशः आभार🙏🏻🙏🏻🙏🏻

Girl in a jacket Girl in a jacket Girl in a jacket

अन्नदान योजना

आपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.

सकाळचा नाष्टा १००० रुपये
शाकाहारी जेवण २५०० रुपये
मांसाहारी जेवण ३००० रुपये
अशी अन्नदान योजना आहे.


Bank QR Code
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२ आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्र्म जवळ