मुंबई दर्शन
Date:06 JAN,2025
मुंबई चे आकर्षण सर्व जणांना आहे..तसेच ते आपल्या मुलांना ही होते.म्हणून दिनांक ४ आणि ५ जानेवारी २५ रोजी त्यांना आणायचे ठरवले. त्या साठी सर्व फोना फोनी, मेल आणि प्रत्यक्ष जाऊन काही ठिकाणी सर्व ठरवले. आणि तो दिवस आला. पहाटे साडे तीन वाजताच सर्व जण तयार होऊन बसले. हनुमान रोड ला आम्हाला पीक अप करताना थोडे उजाडले होते आणि नेमके प्रथमच विमान उडताना पाहून त्यांना जो काही आनंद झाला ... तो अवर्णनीय आहे. तिथून बांद्रा सी लिंक ची माहिती सांगताना आसपास चां परिसर, समुद्र पाहून त्यांना मज्जा आली.. थोडे पुढे फ्री वे वरून जाताना त्यांना सांगितले की आपण समद्राच्या खाली आहोत ऐकून त्याना खूपच आश्चर्य वाटले. गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल ची त्यांना प्रथम माहिती सांगितली बस मध्ये आणि खाली उतरल्यावर काय पाहू, कुठे पाहू असे त्यांना झाले. बोटी,समुद्र , मोठ मोठ्या बिल्डिंग आणि ताज ची कला कुसर आणि टाटा घराण्याचा इतिहास ऐकून खूप मज्जा आली. नंतर हँगिंग गार्डन ची माहिती सांगून त्यांना म्हातारीचा बुट दाखवायला नेले आणि मुंबई ला पाणी पुरवठा इथेच खाली असलेल्या टाकी मूळ होतो हे ऐकल्यावर त्यांना आश्चर्य वाटलेले दिसले. थोडासा वेळ होता म्हणून महालक्ष्मी देवळात नेले. यानंतर महत्वाचे म्हणजे नेहरू तारांगण येथील मराठी मधील शो. प्रथमच एअर कंडीशन मध्ये बसून असा शो.. आभाळतील एवढी किमया पाहून तोंडे बोटात गेली. तिथून पुढे वीरमाता जिंजाबई उद्यान येथे जिवंत प्राणी ... ओहो..वाघ, अस्वल, बिबट्या, बारा शिंगी सांबार,विविध पोपट्,मोर,कासव ...सर्व डोळे विसफारून पाहत होते..खूपच खुशी ओसंडून वाहत होती...त्या नंतर एवढ्या पॉवर पॅक कार्यक्रमांनंतर सुध्धा जे get together सर्व दात्यासाठी ठेवले होते त्यात लगेच तयारी करून उत्साहाने त्यांनी स्वतःच ठरवलेली गाणी आणि नाचं त्यांनी केले आणि आलेल्या पाहुण्यांना खुश खरेच धन्य वाटले. रात्री परत येताना आइस क्रीम पार्टी एकदम जोरात केली. आणि झोपायला गेलो...पण रात्र भर नुसता चिवचिवाट होता...दिवसभर च्या सर्व गोष्टींचा...
दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ तारीख ला आदल्या दिवशीचा शिण कुठेच नव्हता..त्याच उत्साहाने मुले सकाळी ५.४५ ला नवीन शिवलेल्या ड्रेस मध्ये तयार होते.. पार्ल्यात सर्व सामान गोळा करून आणि नाष्टा पाणी करून आठ वाजता आम्ही बोरिवली येथील राष्ट्रीय उद्यान मध्ये गेलो..तिथली हिरवाई, माकडे, हरीण, वाघ..इत्यादी मुक्त वावर पाहून खूप खूष झाली.. पुढे कान्हेरी caves येथील लेणी..हा प्रकार प्रथम च पाहिला आणि बुध्द शैली त्यांना थोडी कळली. आणि मग सर्वना असलेल्या पाण्याच्या आकर्षणाचं स्थान म्हणजे वॉटर किंग्डम ला पोचलो..तिथे एकूण एक रायडिंगस त्यांनी कुडकुडत एन्जॉय केल्या.परत परत जाऊन, एकमेकांना ढकलून ,परत परत घबरणाऱ्या मित्राला नेऊन धमाल केली..सर्वात जास्त रेन डान्स आणि एकाच जागी उभे राहून धबधब्यासाऱखे अंगावर येणारे पाणी ह्या रायडिंग..त्यांचा तो आनंद अवर्णनीय होता... असे हे मुंबई चे प्रथम दर्शन त्यांना आयुष्य भर ची आठवण देऊन गेले...या सर्व प्रवासात आम्हाला मदत केलेल्या एसटी महामंडळ, Essel world चें सर्व कर्मचारी,नेहरू तारांगण चे सर्व ऑफिसर, राणीचा बाग येथील पदाधिकारी आणि फ्रेंड्स circle हॉल, दादर ज्यांनी हॉल दिला , महत्वाचे गेट टू गेदर साठी आलेले सर्व मान्यवर , मुलांसाठी दोन दिवसाचा नाष्टा,जेवण,खाऊ, इतर खाऊ , स्टेशनरी,कपडे, भांडी,sanatary नॅपकिन्स,इतर गोष्टी आणि महत्वाचे रोख स्वरुपात केलेले डोनेशन या सर्वांसाठी दात्यांच्चे खूप खूप आभार.हा संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी मदत केलेल्या सर्व स्वयम् सेवकांचे स्वामी आधार वर्धीनी कडून शतशः आभार🙏🏻🙏🏻🙏🏻
अन्नदान योजना
आपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्र्म जवळ