एकमेका साह्य करू की ज्योतीने ज्योत पेटवू म्हणूया.
Date: June 20, 2024
आज शहरामध्ये सुखवस्तू लोक आहेत ज्यांना हवे ते सहज खरेदी करता येत आहे. तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनी ही नशिबवान आहेत की त्यांना शिक्षणाबरोबरच बाकीच्या सर्व गोष्टी विनासायास पाल्य उपलब्ध करून देत आहेत.त्यामुळे त्यांना त्याचे महत्त्व नाही आहे. पण महत्त्वाचे म्हणजे सर्वांना याची जाणीव आहे की असा एक वर्ग आहे जिथे ह्या सर्वाची गरज आहे. परंतु उपलब्धता त्यांना नाही. अशा गरजू मुलांना ते लगेच मदत देतात. हीच माणसे मग आपल्या सारख्या संस्थेला मदत करतात.
वर्षातून साधारण पणे जूनच्या सुरुवातीला शाळा चालू होते तेव्हा, दिवाळीच्या आसपास, नाताळ सुट्टी मध्ये जेव्हा शहरात घराची साफ सफाई होते तेव्हा घरातील अतिरिक्त सामान काढले जाते.त्यावेळी भरपूर प्रमाणात कपडे, पुस्तके, वह्या , भांडी, चपला, नकली दागिने, शो पिसेस तत्सम भरपूर सामान संस्थेकडे येते. त्यात आपल्या मुलांना आणि संस्थेला लागणारे गरजेचे सामान ठेवून बाकीचे सामान आजूबाजूला पाड्यांवर आणि वीट भट्टी कामगारांना वाटण्यात येते. असे वाटप करताना आश्रमातील मुलांनाही नेले जाते. ज्या मुळे त्यांनाही द्यायची सवय लागावी.
मुंबई मधील लोकांचा असणारा विश्वास ही खूप मोलाची गोष्ट यात आहे. शेवटी देणाऱ्याचे हाथ हजारो दुबळी माझी झोळी..
अन्नदान योजनाआपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
G-Pay:9869639355
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२
आश्रमाचा पत्ता.... अंबिस्ते, जि.वाडा, ता.पालघर यतीश गोट फार्म जवळ